हॅमिल्टन : तंदुरुस्तीसाठी कोणतीही तडजोड न करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचे थरारक स्टंट सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.
संघ न्यूझीलंड दौ-यावर असून तेथील जिममध्ये कोहलीने तंदुरुस्तीसाठी चक्क बॉलीवुडच्या धर्तीवर स्टंटबाजी केली व त्याला काही सेकंदातच लाखो लाईक्स मिळाले. कोहलीने जिममधील व्यायामाचा तसेच पायांच्या तंदुरुस्तीसाठी केलेला एक स्टंट व्हिडीओरूपात शेअर केला.
https://www.instagram.com/p/B713u80lMec/?utm_source=ig_web_copy_link
जिममध्ये कोहलीसमोर दोन बॉक्स आहेत, कोहली त्यावर उडी मारून बॅलन्स करताना दिसत आहे. यापूर्वी देखील कोहलीने व्यायामाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.