‘आरटीई’ शुल्क प्रतिपूर्तीची माहिती सादर करण्याचे आदेश

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गतच्या (आरटीई) 25 टक्के प्रवेशाच्या शुल्क प्रतिपूर्तीची माहिती सादर करा, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.

“आरटीई’ प्रवेशबाबत अनेकदा तक्रारी आल्या होत्या. त्या जाणून घेत सोडवण्यासाठी उपाययोजनाही राबवण्यात आल्या. 2012-13 ते 2018-19 पर्यंतच्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबत शाळांना अदा केलेल्या सर्व अनुदानाबाबतचे वर्षनिहाय उपयोगिता प्रमाणपत्रही सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. इयत्तानिहाय प्रवेशित विद्यार्थी, पालक-शिक्षक संघाने निश्‍चित केलेली फी याबाबतची माहिती मागवण्यात आलेली आहे. शुल्काबाबतच्या तक्रारी शाळांकडून येत आहेत. याचीही दखल घेण्यात आलेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.