नवी दिल्ली :- सध्याच्या काळात विराट कोहली आणि रेकॉर्ड हे एकमेकांचे समानार्थी शब्द बनले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोहली इतक्या मोठ्या स्तरावर उभा राहिला आहे की या दिवसात तो कोणत्याही सामन्यात पाऊल ठेवतो, काहीतरी रेकॉर्ड किंवा दुसरे घडते. आणि आता कोहली पुन्हा एकदा आशिया चषक 2023 स्पर्धेतच इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषकास आजपासून सुरूवात झाली आहे.
आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. शनिवारी, 2 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. याच सामन्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील 13,000 धावांचे लक्ष्य गाठून विराट कोहली तेंडुलकर आणि कांगारूंचा माजी दिग्गज रिकी पॉंटिंग यांच्या पंक्तीत सामील होईल. त्यासाठी विराटला फक्त 102 धावांची गरज आहे. आणि विराट आशिया कपमध्येच ही कामगिरी करेल, याची त्याच्या चाहत्यांना खात्री आहे. ही कामगिरी करणारा विराट हा जगातील केवळ पाचवा फलंदाज ठरणार आहे.
विराटच्या आधी सचिन, कुमार संगकारा, रिकी पॉंटिंग आणि सनथ जयसूर्या हेच फलंदाज आहेत ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
वनडेमध्ये वेगाने 13 हजार धावा करणारे फलंदाज –
सचिन तेंडुलकर – 321 डाव
रिकी पाँटिंग- 341 डाव
कुमार संगकारा- 363 डाव
सनथ जयसूर्या- 416 डाव
विराट कोहली : 265 डावात 12898 धावा
त्याचबरोबर सचिनला मागे टाकून वेगवान तेरा हजारी बनण्याचीही संधी कोहलीला असेल. सध्या वेगवान तेरा हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने हा आकडा स्पर्श करण्यासाठी 321 डाव घेतले होते. तर कोहलीने सचिनला मागे टाकताना 266 डाव खेळले आहेत.