T20 World Cup – टी-२० विश्वचषक स्पर्धा १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणार आहे. त्याअगोदर भारतीय संघ काही सराव सामने खेळण्यासाठी तिथे पोहोचला आहे. भारतीय खेळाडूंनी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाविरुध्द विरुद्ध एक सराव सामनाही खेळला आहे. सराव सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात फिरताना दिसला. संघ व्यवस्थापनाकडून खेळाडूंना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली होती. यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीने ( Virat Kohli ) आपल्या लूकमध्ये बदल केला आहे. याबाबतचे काही फोटोही त्याने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
विराट कोहलीने ( Virat Kohli ) प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जॉर्डन टेबचमनकडून आपला हेअरकट केला आहे. जॉर्डन टेबचमनने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर स्वतःचा आणि विराट कोहलीचा ( Virat Kohli ) एक फोटोही शेअर केला आहे. कोहली अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांना स्वतःला स्टायलिश दिसण्याची जास्त आवड असते. कोहली त्याच्या वेगवेगळ्या लाईफस्टाईल मुळे नेहमीच चर्चेत असतो.
टी-२० विश्वचषक ( T20 World Cup ) स्पर्धा २९ दिवस चालणार असून या स्पर्धेत एकूण ४५ सामने खेळवले जाणार आहेत. सहभागी संघांबद्दल बोलायचे झाले तर १६ देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. स्पर्धेच्या सुपर-१२ मध्ये आठ संघांना सरळ स्थान मिळाले आहे. त्याचबरोबर उर्वरित आठ संघ हे पहिल्यांदा पात्रता फेरीत खेळतील. तसेच चार-चार संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दोन्ही गटातील टॉप २ संघ सुपर-१२ मध्ये प्रवेश करतील. १६ ऑक्टोबरपासून पहिल्या पात्रता फेरीचे सामने खेळवले जातील. त्याचबरोबर २२ ऑक्टोबरला सुपर-१२ सामने सुरू होणार आहेत.
View this post on Instagram
टी-२० विश्वचषकासाठी ( T20 World Cup ) भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.