IND vs PAK – विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) 7 गडी राखून पराभव केला. भारताने या स्पर्धेत सलग तिसरा विजय मिळवला आहे. याआधी भारतानं ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. भारताचे आता तीन सामन्यांत सहा गुण झाले आहेत.
विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानवर सलग आठवा विजय आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ 20 तारखेला बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ 42.5 षटकांत 191 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 30.3 षटकांत 3 गडी गमावत 192 धावा करून सामना जिंकला.
टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. भारताचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा पाकविरुद्ध एकदाही पराभव झालेला नाही.
Wasim Akram says “Babar Azam shouldn’t have asked Virat Kohli his Tshirt”pic.twitter.com/KREc7H41Pm#INDvsPAK #indvspak2023 #Rizwan #RohitSharma𓃵 #IndiaVsPakistan #CWC23 #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/NEhiFEzEMp
— ICT Fan (@Delphy06) October 14, 2023
दरम्यान, हा सामना संपल्यानंतर मैदानात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांची भेट घेतली. यावेळी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (virat kohli) पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (babar azam) आपली 18 क्रमांकाची जर्सी (jersey) भेट देऊन उपस्थित चाहत्यांची मने जिंकली.
विराटच्या या स्टाइलला क्रिकेट चाहत्यांचा पाठिंबा मिळाला. या मैत्रीपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खुद्द आयसीसीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केला आहे.
पण ही घटना पाकच्या माजी क्रिकेटपटूंना झोंबली असून त्यांनी आपल्याच खेळाडूवर टीकेची झोड उठवली आहे. पाकिस्तानी दिग्गज माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम (wasim akram) नाराज झाला आहे. विराट कोहलीने (virat kohli) बाबर आझमला (babar azam) जर्सी (jersey) भेट दिल्यावर वसीम अक्रम यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले, “बाबर आझमला आज असं करायला नको होतं. हे चित्र पाहिल्यावर मला वाटलं की आज हा दिवस नाही. जर तुम्हाला असं करायचं असेल आणि तुमच्या काकांच्या मुलाने कोहलीची जर्सी मागितलीच होती तर,
तुम्ही मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्याकडून ती जर्सी घ्यायला हवी होती मैदानात नाही.’ असं ते म्हणाला आहेत. एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान वसीम अक्रम (wasim akram) बोलत होते.