नवी दिल्ली – दिल्लीत चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बाबा हरिदास नगर (Haridasnagar) भागात ईडीचे अधिकारी (ED officer) असल्याचे भासवत कारमधून आलेल्या बदमाशांनी 3.20 कोटी रुपयांची लूट केली असल्याचे समोर आले आहे. (fake ED officer)
माहिती मिळताच पीसीआर व्हॅनने कारचा पाठलाग करून नरेला येथे कार थांबवून 70 लाख रुपये जप्त केले. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे या सर्व प्रकार घडला. (Delhi Crime)
पीडित नागरिकाने सांगितले की, शुक्रवारी रात्री आठ वाजता तो काहीतरी खायला गेला होता. त्यानंतर एका कारने पाच ते सहा जण त्यांच्या घरी आले. त्यांनी स्वत:ची ओळख ‘ईडी अधिकारी’ अशी करून दिली.
मग या बदमाशांनी त्याला मित्रौण आणि सुरखपूर परिसरात दोन तास फिरवले आणि नंतर पैसे घेऊन घरातून पळ काढला. पोलिसांनी सोनीपतचा रहिवासी असलेल्या विक्की या आरोपीला अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.