“विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर होणारच”

मनसेकडून शिवसेनेची विरप्पन गॅंगशी तुलना

मुंबई –  पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचा मनसे पक्षाचा निर्धार आहे. शिवसेनेची परंपरागत सत्ता खाली करण्यासाठी शक्‍य ते सर्व करु, असे सांगितल्याने या महापालिका निवडणुकांच्या रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.

यातच  महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये होणार आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे.  मनसेने मुद्यावरून शिवसेनवरहल्लाबोल करत ट्विट  केले आहे. 

दरम्यान,  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे की,’विरप्पनने जेवढं लोकांना लुटलं नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,’ असं ट्विट करत त्यांनी  मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेची तुलना विरप्पन गँगशी केली आहे.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.