पुणे – मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी करून मराठी-कन्नड वाद भडकाविणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी मानसिकदृष्ट्याच आजारी पडले आहेत. त्यांना “गेट वेल सून’च्या शुभेच्छा देणारे पत्र आणि गुलाबपुष्प प्रवाशांमार्फत पाठविण्याचे अभिनव आंदोलन राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर हे आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकचे राजकारणी विनाकारण मराठा-कन्नड वाद भडकावित आहेत. सामान्यांचा त्यांना पाठिंबा नाही. त्यामुळे एसटी बसमधून कर्नाटककडे निघालेली प्रवाशांमार्फत सवदी यांच्यासाठी पत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांच्यासह विनोद पवार, श्रीनिवास मेखला, नचिकेत साळवी, सचिन राजगुरु, गणेश विटकर, सागर पिलाने आदी उपस्थित होते.