नांदुर – नांदुर (ता. दौंड) सहजपुर येथील औद्योगिक वसाहती मधील एका नामांकित कंपनीमुळे या परिसरात अनेकजण कोरोना संक्रमित असल्यामुळे गावकामगार तलाठी यांनी या औद्योगिक परिसरात माहिती आणि पाहणी केली.
दरम्यान, परिसराती माहिती घेत असताना काही कोरोना बाधितांचा तलाठी यांच्याशी संपर्क आल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांनी खाजगी स्लॅब टेस्ट केलं असता ते पॉजिटीव्ह आले. परंतु त्यांच्याबरोबर त्यांची आई व मुलगी यांचे देखील अहवाल पॉजिटीव्ह आले असून, त्यांच्या सह आई व मुलगी आता पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपायचार घेत आहे.
दरम्यान, या नामांकित कंपनीमधील इतरही काही हंगामी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना पाॅझिटिव्ह असून कंपनीने मात्र त्यांच्या कडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.