पुणे – प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांचे कौटूंबिक मित्र राजेश दामले यांनी आज माध्यमांना दिली आहे.
Pune, Maharashtra | Seasoned actor #VikramGokhale‘s condition is very critical. He is fighting since the last 24 hours. He has suffered multiple organ failure. Doctors are trying their level best: Rajesh Damle, a family friend of the veteran actor pic.twitter.com/1J4Xy5SMxJ
— ANI (@ANI) November 24, 2022
माध्यमांशी बोलतांना राजेश दामले म्हणाले,’विक्रम गोखले क्रिटिकल आहेत.त्यांचे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाले आहे. त्यांची बॉडी हवा तसा प्रतिसाद देत नाहीये. डॉक्टर यांनी आम्ही प्रयत्न करतो आहे असं सांगितले आहे. लोकांनी कुठल्याही अफांववर विश्वास ठेऊ नये, प्रयत्न चालू आहेत. जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत तोपर्यंत कोणी ही अफवा पसरवू नका.’ अशी माहिती त्यांनी दिली आहे,