Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या सौंदर्यासह अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. चंद्रमुखी या चित्रपटामुळे ती प्रसिध्दीच्या झोतात आली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे आणि नृत्याचे प्रचंड कौतुक करण्यात आले. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. मात्र तिने इनस्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे चाहत्यांनी तिच्याबाबत चिंता व्यक्त केली.
अमृता मागील दोन महिन्यांपासून आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितले आहे. इंस्टाग्राम वर शेअर केलेला स्टोरीमध्ये अमृताने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. यासोबतच तिने लिहिले की, “मागील दोन महिने मला थोडे कठीण गेले, मला डेंगू आणि ब्राँकायटिस या आजाराची मला सामना करावा लागला. मध्यंतरीचा काळ हा प्रत्येक क्षणी मला थकवा देणार होता. मला असं वाटतं की मी कोणत्यातरी नव्या संकटात अडकले आहे. पण या काळात माझा धीर खूप वाढला. माझ्या मते तुम्ही जसे आहात तसेच राहा इतर लोक तुमचे आपोआप अनुकरण करत राहतील. जर तुम्ही कष्ट करत असाल तर विश्वास ठेवा, पुढे सगळं काही ठीक होईल.” यावेळी तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान, अभिनेत्री मेघा घाडगे देखील मागील काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात उपचार घेत आहे. सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो शेअर करत तिने याबाबत एक माहिती शेअर केली होती. त्यानंतर चाहत्यांनी देखील तिला तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला.
अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाच्या यशानंतर आता अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले होते. लवकरच ही जोडी नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘पठ्ठे बापूराव’ असे या चित्रपटाचे नाव आहे. लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे जीवनचरित्र या चित्रपटातून उलगडणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शनाची प्रसाद ओकने केले आहे. ‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटात अमृता खानविलकर ‘पवळा’च्या भूमिकेत दिसणार आहे.