रोहित पवारांच्या प्रचारासाठी आगळा वेगळा ‘विजयरथ’

जामखेड: सध्या राज्यभर निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आपापल्या प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या युक्ती लढवत आहेत. अशीच एक भन्नाट युक्ती संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात पाहायला मिळतेय. महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेनवडी येथील शिवाजी गदादे व पुणे नगरसेविका प्रिया गदादे यांनी आगळा वेगळा ‘विजयरथ’ साकारला आहे.

या रथावर चहू बाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या समोरील छतावर घड्याळ टांगले आहे. तर दर्शनीय बाजूस राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांचे झेंडे लावण्यात आले असुन, या रथामध्ये विठ्ठलाचे रूप धारण केलेला युवक उभा आहे. पवार यांच्या विजयात या विजयरथाचाही वाटा असेल असा विश्वास यावेळी शिवाजी गदादे यांनी बोलताना व्यक्त केला.

हिटलरशाहीचा नाश व्हावा म्हणुन रथात विठ्ठल उभा!
गेली तीस वर्षे वारकरी सेवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत. राज्यातील जनता हिटलरशाहीपासुन वाचावी, आश्वासने व दिशाभूल करून जनतेची फसवणुक होत आहे. विकासाबाबत हे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेला बुद्धी द्यावी म्हणुन हा विठ्ठल कमरेवर हात ठेवुन रथात उभा असल्याचे गदादे यांनी सांगितले 

कर्जत-जामखेडच नव्हे तर राज्यभरातुन राष्ट्रवादी पक्षावर अतोनात प्रेम असलेले असंख्य कार्यकर्ते आहेत. कर्जत जामखेडचा विचार केला तर अनेकांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी वेगवेगळे पण केले आहेत. रोहित पवार आमदार झाल्यानंतरच अंगात शर्ट चढवेल, पायात चप्पल घालेन, दाढी करेल, काहींनी तर रोहित पवार आमदार होत नाहीत तोपर्यंत विवाह करणार नसल्याची खूणगाठ बांधलेले कार्यकर्ते मतदारसंघात पहायला मिळत आहेत.

दरम्यान कर्जत जामखेड मतदार संघात भाजपचे मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे युती आणि आघाडीकडून हि निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. निवडणुकीनंतर कर्जत जामखेडची जनता कुणाच्या पारड्यात वाजन टाकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)