Vijay Wadettiwar | राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम ( Dharamraobaba Aatram) यांनी केला आहे. आत्राम यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महायुतीच्या एका सभेदरम्यान आत्राम यांनी हे वक्तव्य केलं आहे.
त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या Vijay Wadettiwar |
आलपल्लीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत महायुतीच्या सभेत मंत्री आत्राम म्हणाले, 4 जूननंतर म्हणजे लोकसभेचा निकाल लागल्यानंतर वडेट्टीवर भाजमध्ये प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले, की 4 जूननंतर विरोधी पक्षनेते आमच्यामध्ये येऊन बसतील. ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. त्यांनी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका केल्या आहेत. या बैठकांचा मी साक्षीदार आहे. चर्चा झाली मला माहीत आहे, असं धर्मराव बाबांनी म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
पुढे बोलताना मंत्री धर्मराव म्हणाले की, मी आदिवासी माणूस आहे. आदिवासी माणूस खोटा बोलणार नाही, विजय वडेट्टीवार हे अशोक चव्हाण यांचे राईटहॅंड आहेत. आता चव्हाणच भाजपमध्ये आले आहेत. त्यानंतर नामदेव उसंडी, प्रकाश देवतळे भाजपात आले आहेत. त्यानंतर लवकरच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार भाजपात येणार आहेत. वडेट्टीवार भाजपात जाणार असल्याची चर्चा झालीय, असा दावाही अत्राम यांनी केला.
मी कुठेही जाणार नाही Vijay Wadettiwar |
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा खोडून काढला आहे. मी कुठेही जाणार नाही. मी काँग्रेसमध्येच आहे. धर्मरावबाबा खोटं बोलत आहेत. त्यांची नार्को टेस्ट करा. दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.