Vijay Vadettiwar – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान कॉंग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मोबाईलवर धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती कळविली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे.
मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत असल्याचे चित्र आहे.
त्याची धग आता थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यापर्यंत तर येऊन पोहचली नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
कारण, विजय वडेट्टीवार यांनी नुकतेच जरांगे पाटलांवर काही वक्तव्य केली होती. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.