Baramati Lok Sabha Election | बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
यादरम्यान ‘माझा आवाका काय, माझी लायकी काय हे अजित पवारांना सांगतो असं म्हणत विजय शिवतारे यांनी अनेकदा अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावर आता अजित पवार गटाचे गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण शिवतारे यांच्यावर खोचक टीका केली आहे
नेमकं काय म्हणाले सूरज चव्हाण
अजितदादांना आव्हान देणाऱ्या विजय शिवतारेंना गेल्यावेळी आम्ही सांगून पाडलं होतं, यावेळी त्यांचं डिपॉजिट जप्त करू असं आव्हान सूरज चव्हाण यांनी केलं आहे. ते पुढे म्हणाले,’विजय शिवतारे हे महायुतीच्या घटक पक्षातील आहेत. कोणीही निवडणुक लढवू शकतो. मागच्यावेळी आम्ही सांगून त्यांचा पराभव केला होता, यावेळी सांगून त्यांचे डिपॅाझीट जप्त करू. त्यांच्या किडनीवर नाही तर त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. आम्हालाही पाहायचे आहे की शिवतारेंचा आवाका काय आहे?’ असा खोचक सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना विचारला आहे.
हे वाचाल का या? लोकसभा लढवण्याच्या प्रश्नावर वसंत मोरेंचे बिनधास्त उत्तर ; म्हणाले,”ज्या दिवशी मी लोकसभेच्या रिंगणात..”