Vijay Mallya On RCB WPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर फ्रँचायझीने रविवारी रात्री WPL 2024 चे विजेतेपद जिंकून ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फ्रँचायझीचा पुरुष संघ गेल्या 16 वर्षांपासून जे करू शकला नाही, ते दुसऱ्या सत्रातच त्यांच्या महिला संघाने करून दाखवले.
अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. बंगळुरूच्या या विजयानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, माजी फ्रँचायझी मालक विजय मल्ल्या यांनीही टीमसाठी ट्विट केले आहे. जे सध्या खूप व्हायरल होत आहे.
WPL 2024 चे विजेतेपद जिंकल्याबद्दल विजय मल्ल्या याने RCB चे अभिनंदन केले. यंदाच्या आयपीएल 2024 चे विजेतेपदही पुरुष संघाने जिंकले तर आनंद द्विगुणित होईल, असेही तो म्हणाला.
विजय मल्ल्या याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “WPL जिंकल्याबद्दल RCB महिला संघाचे हार्दिक अभिनंदन. आरसीबी पुरूष संघानेही यंदा बहुप्रतिक्षित आयपीएल जिंकल्यास आनंद द्विगुणित होईल. गुड लक.’
Heartiest congratulations to the RCB Women’s Team for winning the WPL. It would be a fantastic double if the RCB Men’s Team won the IPL which is long overdue. Good Luck.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) March 17, 2024
विजय मल्ल्याच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी सांगितले की, “चला एक करार करू, जर RCB ने IPL 2024 चे विजेतेपद जिंकले तर तुम्हाला त्यासाठी भारतात यावे लागेल.
Let’s make a deal if men’s RCB team wins IPL 2024, you will be returning to India. pic.twitter.com/YqzUn4ZQ9A
— Godman Chikna (@Madan_Chikna) March 17, 2024
एका यूजरने लिहिले की, “विजय मल्ल्या त्याच दिवशी पोस्ट करतात जेव्हा बँकेची सुट्टी असते.”
WPL 2024 : चॅम्पियन आरसीबीवर पडला पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
दरम्यान, विजय मल्ल्या याच्यावर स्टेट बँक ऑफ इंडियासोबत फसवणूक केल्याचा आरोप आहे. बँकांचे 9000 कोटी रुपये घेऊन तो देशातून फरार आहे. सध्या तो लंडनमध्ये आपले जीवन व्यतीत करत असल्याचे सांगण्यात येत आहे.