मुंबई – ‘द नाईट मॅनेजर’ हा जॉन ले कॅरेच्या त्याच नावाच्या कादंबरीचा आणि त्याच नावाच्या ब्रिटीश टीव्ही मालिकेचा हिंदी रिमेक आहे. ही कादंबरी 1993 मध्ये आली होती, ज्यावर 2026 मध्ये सुझान बीअरच्या दिग्दर्शनाखाली ब्रिटिश टीव्ही मालिका आली होती. 180 हून अधिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जाणार्या टीव्हीच्या जगातील ही सर्वात यशस्वी मालिका आहे.
दोन एम्मी पुरस्कार आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या मालिका आता प्रियांका घोष आणि रुख नबिल आणि संदीप मोदी यांनी हिंदीमध्ये भारतीय प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. ओटीटीच्या जगात ‘द नाईट मॅनेजर’ भारतीय प्रेक्षकांनी यापूर्वी इंग्रजीत पाहिला आहे. ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अशात या वेब सिरीजमधील एक पात्र चांगलेच चर्चत आले आहे,
या वेब सीरिजमध्ये एका एपिसोडमध्ये वकिलाचे पात्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. या वेब सीरिजमध्ये विजय मल्ल्याने अभिनय केला आहे. असं म्हणत या पात्राला चांगलेच ट्रोल केले जात आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरु केली आहे.
‘द नाईट मॅनेजर’ची कथा
हेरगिरी थ्रिलर द नाईट मॅनेजर ही हॉटेल नाईट मॅनेजर आणि माजी नौदल अधिकारी शान सेनगुप्ताची कथा आहे. बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा व्यवसाय करणारी शैलेंद्र रुंगटा ही खतरनाक टोळी त्याचे टार्गेट आहे. ही लढाई जिंकण्यासाठी शान सेनगुप्ता शैलेंद्रच्या टोळीत घुसखोरी करतो आणि मग इथून कथा पुढे सरकते.