Narendra Modi Poster । देशातील बँकांना चुना लावून परदेशात फरार झालेले कथित उद्योजक नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह असलेले पोस्टर दिल्लीत विविध ठिकाणी लावल्याचे आढळून आले.
नीरव मोदी आणि मल्ल्या हेच नरेंद्र मोदी यांचे कुटुंब असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. संबंधित पोस्टरच्या खाली भारतीय युवा कॉंग्रेस असे लिहिण्यात आले असून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. । Narendra Modi Poster
दिल्ली महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारवरून एफआयआर दाखल करण्यात आली असून वादग्रस्त पोस्टर आता हटवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे पोस्टर सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. । Narendra Modi Poster