नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली महापालिकेत भाजप विरुद्ध आम आदमी पार्टी असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे. काल भाजप नगरसेवक आणि आप नगरसेवक यांच्यात पुन्हा एकदा धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले होते परिणामी याचे रूपांतर मोठ्या राड्यात झाले. या राड्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हे खरंच लोकप्रतिनिधी आहेत का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
स्थायी समितीच्या निवडणुकीवरून दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये जुंपली आणि प्रकरण पार हाणामारीपर्यंत गेले. शुक्रवारी उशीरापर्यंत हा प्रकार सुरू होता व दोन्ही पक्षांनी परस्परांवर आरोप केले आहेत. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सभागृत झालेल्या या राड्यावेळी काही नगरसेवक एका नगरसेवकाला धक्काबुक्की करतात. त्यानंतर त्याला लाथाबुक्यांनी मारहाण करतात विशेष म्हणजे हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
#WATCH | Delhi: Clashes continue at Delhi Civic Centre as AAP and BJP Councillors rain blows on each other over the election of members of the MCD Standing Committee. pic.twitter.com/qcw55yzRrQ
— ANI (@ANI) February 24, 2023
यावेळी नवनिर्वाचित महापौर शेली ओबेरॉय यांना देखील धक्काबुक्की झाल्याचा आरोप आपच्या नेत्यांनी केला आहे. तसेच भाजपने हार मान्य करून सभागृहातील गुंडागर्दी थांबवावी अशी मागणी अप नेत्यांकडून करण्यात आली आहे.
हिंसाचाराला सुरूवात विरोधी पक्षाने केली असा आरोप दोन्ही बाजूने केला जातो आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या इशाऱ्यावर आपची हुकुमशाही आणि गुंडगिरी सुरू असल्याची टीका भाजपने केली आहे.