Vicky Kaushal ‘Chhava’ Film | अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. यात विकी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून अभिनेत्री रश्मीका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात तीन मराठी कलाकारांची वर्णी लागली आहे.
शुभंकर एकबोटे, संतोष जुवेकर आणि आशिष पाथोडे हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. आशिष पाथोडेने छावाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शुभंकरने रिपोस्ट केला असून विकीला सुद्धा या स्टोरीमध्ये टॅग करण्यात आलं आहे. छावा चित्रपटातील सीनचं शूटिंग रात्रीच्या वेळी सुरू असल्याचे यात दिसत आहे. या फोटोमध्ये दोन मशाली जळत असून बाजूला भगवे ध्वज लावलेले दिसत आहेत. Vicky Kaushal ‘Chhava’ Film |
दरम्यान, ‘मिमी’ फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अक्षय खन्नाही यात दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. अक्षयही छावाचा भाग असणार आहे. या चित्रपटात तो औरंगजेबाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे. Vicky Kaushal ‘Chhava’ Film |
या तिन्ही कलाकारांना विकिसोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. या आधी संतोष ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. आता पुन्हा एकदा तो ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
ओम फट स्वाहा !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! नव्या सिनेमाचे पोस्टर रिलीज