मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाने फार कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण त्यांच्यासोबत तिने वेगळी छाप सोडली आहे आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. मात्र ती तिच्या खाजगी आयुष्यामळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकतेच दियाने तिच्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
दिया मिर्झाने तिच्या मुलाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. मुलाच्या वाढदिवसानिमित्त जंगल थीमचे आयोजन केले होते. दियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती मुलासोबत केक कापताना दिसत आहे. या फोटोंमध्ये दिया तिच्या मुलासोबत आणि पाहुण्यासोबत एकत्र असल्याचे दिसते.
मुलाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत दियाने पोस्टमध्ये लिहिले की, “या लिटल मास्टरसोबत 2 वर्षांची जादू. माझ्या प्रिय अयान आझाद, मला तुझी आई म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. यापेक्षा जास्त आनंद दुसरा कोणताच असू शकत नाही. 14 मे हा नेहमीच माझा आवडता दिवस असेल.”
दियाच्या या पोस्टवर मलायका अरोरा, नकुल मेहता, नीती मोहन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, दियाने फेब्रुवारी 2021 मध्ये व्यापारी वैभवशी लग्न केले आणि 14 मे 2021 रोजी या जोडप्याने त्यांचा मुलगा अयानचे स्वागत केले.
View this post on Instagram
दिया मिर्झाने तिच्या पहिल्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळवली आणि आजही अनेक लोक तिला या चित्रपटाची नायिका म्हणून ओळखतात. दिया आता तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, फातिमा सना शेख आणि संजना संघी यांच्यासोबत ‘धक धक’मध्ये दिसणार आहे. तरुण दुडेजा दिग्दर्शित, ‘धक धक’ हा चित्रपट साहसी प्रकारातील आहे, जो एका मुलींच्या टोळीने केलेल्या रोड ट्रिपची कथा आहे.