लाहोर : पाकिस्तानातील आर्थिक घडी पूर्णपणे बिघडली आहे. याठिकाणी अन्नाचा तुटवडा आणि त्यात वाढत्या महागाईने पाकिस्तानी जनतेचे कंबरडे मोडले आहे. अलीकडे पाकिस्तानातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात पाकिस्तानातील महागाई भयाण आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल. पण सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसले. व्हिडीओमध्ये रस्त्यावर बसून काही भिकारी नोटा मोजत असल्याचे दिसत आहेत.
पाकिस्तानमध्ये पदवीधारांपेक्षा भिकारी अधिक कमाई करत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, स्वत:ला भिकारी म्हणवून घेणारे अनेक तरुण रस्त्यावर बसून पैसे मोजत आहेत. यात प्रत्येकजण रस्त्यावर बसून प्लास्टिकच्या पिशवीतील नोटा काढून त्या मोजण्यात व्यस्त आहे.
Pakistani beggars making more money than the degree holders.😅 pic.twitter.com/pJrTfxRnqB
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 18, 2023
हा व्हिडीओ अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. कारण व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटतेय की, पाकिस्तानात डिग्री घेतलेल्या तरुणापेक्षा रस्त्यावर भीक मागणारा व्यक्ती खूप पैसा कमावतोय.
परंतु हा व्हिडीओ खरचं पाकिस्तानचा आहे का याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे हा व्हिडीओ खरचं पाकिस्तानचा असल्याचा दावा आपण करु शकत नाही. पण ट्विटरवर ज्या युजरने हा व्हिडीओ शेअर केला त्याने पाकिस्तानचा असल्याचा उल्लेख केला आहे. व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट्स देखील दिल्या आहेत.