मुंबई – राखी सावंत नेहमीच काहीना काहीतरी अतरंगी करत असते. सोशल मीडियावर तर राखीचे व्हिडीओज वाऱ्यासारखे व्हायरल होतात. सध्या राखीचा असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील यतम्मा गाण्यावर लुंगी डान्स करताना दिसत आहे.
या डान्स दरम्यान राखीने आपला पोशाख देखील चांगलाच अतरंगी केला आहे. तिने यावेळी जीन्सवर पांढऱ्या रंगाची लुंगी घातली आहे आणि मागे सलमान खानचे यंतम्मा गाणे सुरु असल्याचे समजते. या गाण्यावर राखी डान्स करताना दिसत आहे. भाईजानच्या चित्रपटाचे प्रमोशन राखीने आपल्या खास शैलीत केल्यामुळे नेटकाऱ्यानी तिचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला तिच्या वाढीव स्टाइलवरून सुनावले देखील आहे.
नुकतीच राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. गेल्या वर्षी तिने आदिलशी लग्न केले होते. आदिलसाठी तिने धर्मही बदलला होता. राखीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती आदिलला हार घालताना दिसत होती. मात्र, आदिलने राखीची फसवणूक केली, त्यानंतर अभिनेत्रीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आदिलला तुरुंगातही जावे लागले होते. सध्या तो तुरुंगात आहे. असं असूनही राखीने आपलं काम काही सोडलेलं नाही. म्हणूनच तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
View this post on Instagram
सोशल मीडियावर या व्हिडिओला पसंती मिळत आहे. एका यूजरने लिहिले,दीदीने लुंगीची पुंगी वाजवली. तर दुसऱ्या एकाने ‘राखी इज फुल एन्टरटेनर’ अशी कमेंट केली आहे. पहिल्यांदाच राखीच्या या अतरंगी पनावर नेटकरी काहीसे खुश झाले आहेत. ज्यामुळे यावेळी राखीला फारस कोणी टार्गेट केलेलं दिसत नाही.