नवी दिल्ली : तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात मुलाच्या गांजाच्या व्यसनामुळे बिघडत चाललेल्या मुलाला एका आईने वठणीवर आणण्यासाठी चक्क मिरचीची धुरी दिली आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात एका आईने आपल्या १५ वर्षांच्या मुलाला खांबाला बांधून त्याच्या चेहऱ्यावर मिरची पावडर लावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.आईने त्याला बेदम मारहाण केली असून शिक्षा म्हणून त्याच्या चेहऱ्यावर मिरचीपूड टाकली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
What happened when a mother found out that her 15-yr-old son was becoming a ganja addict? She came up with a unique treatment. Tie him to a pole & rub mirchi powder in his eyes & not untie him until he promises to quit. Incident in Kodad, #Suryapet dt, #Telangana. pic.twitter.com/Kw8FXaqtz7
— Krishnamurthy (@krishna0302) April 4, 2022
१५ वर्षांच्या मुलाला गांजाचे इतके व्यसन होते. त्याच्या या व्यसनाने आई चिंतेत असायची मात्र एकदिवस आईचा राग अनावर गेला. त्यामुळे आईने त्याच्या चेहऱ्यावर मिरचीपूड टाकत बेदम मारले. जेव्हा त्याने आपल्या आईला व्यसन सोडण्याचे वचन दिले, तेव्हाच या मुलाची सुटका झाली असल्याचेही बोलले जात आहे.
सुरुवातीला तिने तिच्या मुलाला अनेक वेळा समजवण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगा आपले ऐकत नसल्याने तिने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. तिने तिच्या मुलाला विजेच्या खांबाला बांधले आणि त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर शिंपडली जेणेकरून तो अंमली पदार्थांचे सेवन थांबवेल. अखेर मुलाने आईला व्यसन सोडण्याचे वचन दिले त्यावेळी आईने मुलाची सुटका केली असल्याचे सांगण्यात येत आहे.