मुंबई – अभिनेत्री नेहा शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक बोल्ड आणि हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. अनेकदा बहीण आयशासोबत एकत्र वर्कआउट करतानाचे फोटो देखील तिने शेअर केले आहे. मात्र आता या दोघींंनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघी खूपच बोल्ड दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओने सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेहा आणि आयशा एका बर्फाच्या टबमध्ये बसलेल्या दिसत आहेत. यात त्या दोघींनी हॉट मोनोकिनी परिधान केली आहे. यात त्या खूपच ग्लॅमरस दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत नेहाने लिहिले आहे की, ‘रविवार, संडे व्हायब्स, कोल्ड प्लंज.’ यात नेहा बर्फाने भरलेल्या टबमध्ये उतरत असल्याचे दिसते.
नेहाच्या धाकट्या बहिणीने देखील आईस डीप चॅलेंजमध्ये भाग घेतला आहे. व्हिडिओमध्ये ती लेपर्ड प्रिटेंड बिकिनी घालून बर्फाळ पाण्यात उतरत आहे. सध्या दोघींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
दरम्यान, नेहा शर्माने ‘क्रूक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय नेहाने शर्मा तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल हैं हम, यमला पगला दीवाना, हेराफेरी-3 यासारख्या चित्रपटामध्ये नेहा शर्मा फ्रेश चेहरा दिसला होता. तसेच ती तिच्या बोल्ड आणि हॉट लुकमुळे देखील नेहमीच चर्चेत असते.