उस्मानाबाद – जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील तानाजी जगताप हे हनुमानाचा वेष परिधान करून गावोगावी जाऊन कोरोनाच्या नियमांचे पालन करा, मास्क लावा ,काळजी घ्या अश्या शब्दांत हे जनजागृती करीत आहेत.
जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाकडून वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता हे आधुनिक हनुमान देखील घरोघरी जाऊन आवाहन करत असून त्यांना नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.