भोपाळ : माजी केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केली. भोपाळच्या भेल परिसरातील आझाद नगर येथील दारूच्या दुकानात घुसून उमा भारती यांनी दगडफेक केली. तसेच दारूबंदीबाबत उमा भारतींनी दारू दुकानांबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. दारुच्या दुकानाची तोडफोड करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या वर्षी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेश सरकारने दारू स्वस्त केली होती. मात्र सत्ताधारी भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी गेल्या वर्षी म्हटले होते, की 15 जानेवारी 2022 पर्यंत दारू बंदी होईल. अन्यथा आपण रस्त्यावर उतरू. मात्र दारू बंद होण्याऐवजी दारूसंदर्भात नवीन धोरण आणलं गेलं. त्यानुसार दारू स्वस्त झाली आहे. त्यामुळे उमा भारती आक्रमक झाल्या आहेत.
मध्यप्रदेश की पूर्व मुख्यमंत्री @umasribharti ने भोपाल के बीएचईएल इलाके में आजाद नगर में शराब की दुकान में घुसकर पत्थर फेंका. दरअसल शराबबंदी को लेकर उमा भारती ने शराब की दुकानों के बाहर विरोध प्रदर्शन करने का ऐलान किया है @ndtv @ndtvindia pic.twitter.com/za2w69p3pQ
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) March 13, 2022
नवीन मद्य धोरणांतर्गत विदेशी मद्यावरील अबकारी शुल्क 10 वरून 13 टक्के करण्यात आले आहे. इंग्रजी आणि देशी दारू एकाच दुकानात उपलब्ध असेल. द्राक्षांव्यतिरिक्त, बेरीपासून वाइन देखील बनवण्यास परवानगी असेल. लोक पूर्वीपेक्षा चारपट जास्त दारू घरात ठेवू शकतील. ज्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक कोटी रुपये आहे, तो घरीही बार उघडू शकेल.