मुंबई – मुंबईत इमारतीला आग (Mumbai fire news) लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. आता पुन्हा एकदा मुंबईतील एका इमारतीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. कांदिवली (Kandiwali fire building) पश्चिम येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ,या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. (Mumbai news)
या प्रकरणाची माहिती देताना बीएमसीने सांगितले की, कांदिवली पश्चिम येथील महावीर नगर (kandiwali mahavirnagar) येथील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आज दुपारी आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. (mumbai fire incident)
अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांनी आग आटोक्यात आणली
मिळालेल्या माहितीनुसार, पवन धाम वीणा संतूर इमारतीमध्ये दुपारी 12.27 च्या सुमारास आग लागली. इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.
#WATCH | Mumbai: Earlier visuals of the fire that broke out in the Pavan Dham Veena Santur Building of Mahaveer Nagar in Kandivali West. The fire was taken under control with the help of 8 firefighters. https://t.co/8liMiz4lEb pic.twitter.com/BbQ3hLHmek
— ANI (@ANI) October 23, 2023
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग आटोक्यात आणण्यात यश मिळल असलं तरी आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या घटनेमुळे आसपासच्या इमारतीमधील लोक भयभीत झाले होते.