राजगुरूनगर – खरीप हंगाम नियोजन व इतर विषयांवर खेड तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संगणक ऑपरेटर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी संवाद साधून तालुक्यातील आढावा घेतला. तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेणारी जिल्ह्यातील पहिली खेड पंचायत समिती ठरली आहे.
सध्या करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने खरीप हंगाम आढावा बैठक घेण्यासाठी अडचणी आल्या. त्यामुळे पंचायत समितीने यावर मार्ग काढत व्हिडिओ कॉन्फरन्सचा मार्ग निवडला. यात मुंबई, पुणे व बाहेरुन आलेल्या लोकांना विलगिकरण करणे, रोजगार हमीची कामे, शरद भोजन योजना, पावसामुळे नुकसानीचा आढावा याबाबत चर्चा केल्या.
बैठकीला अनेक गावांतीळ सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांचा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, पश्चिम भागातील काही ग्रामपंचायतीमध्ये नेटवर्क नसल्याने त्यांना सहभागी होता आले नाही.