#video : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी…’ राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राची थेट मुख्यमंत्र्यांना साद

मुंबई – पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती ‘राज कुंद्रा’चे नाव आल्यामुळे एक खळबळ उडाली होती. दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर रातोरात प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री ‘शर्लिन चोप्रा’ सतत त्याच्यावर आरोप करत आहे.

आता शर्लिनने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. एवढं नाहीतर तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीची मागणी केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सुद्धा शर्लिन चोप्राने ट्विट केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई पोलिसांना विनंती करताना दिसते आहे. “माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री पाटीलजी, पोलिस आयुक्त, मुंबई, नगराळे जी, कृपया मला मदत करा.. माझा जाब लवकरात लवकर नोंदवण्यात यावा जेणेकरून सत्य बाहेर येईल.’ असं ती म्हणते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.