नवी दिल्ली : भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-1 चे यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. त्यानंतर आदित्य एल-1 च्या प्रत्येक कार्याबाबत इस्रो एक्स (ट्विटर)द्वारे माहिती देत आहे. आदित्य एल-1 ने पृथ्वी आणि चंद्राची दोन सुंदर छायाचित्रे घेतले आहे. यासोबतच त्याने सेल्फी देखील क्लिक केला आहे.
नुकतेच इस्रोने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये आदित्य उपग्रहाने काढलेला सेल्फी व्हिडिओ आणि पृथ्वी आणि चंद्राचा व्हिडिओ दिसत आहे. आदित्य उपग्रहावरील VELC आणि SUIT हे पेलोड देखील या सेल्फीमध्ये दिसत आहेत. 4 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ टिपण्यात आला असल्याचे यात सांगण्यात आले आहे.
आदित्य एल-1या अवकाशयानाने त्याचा एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. त्याने दुसऱ्यांदा यशस्वीपणे त्याची कक्षाही बदलली आहे. आदित्य एल-1ची कक्षा बदलण्याच्या ऑपरेशनदरम्यान बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधून उपग्रहांद्वारे इस्रोच्या या अवकाशयानाचा मागोवा घेण्यात आला होता. त्यानंतर आता 10 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य एल-1 हे यान तिसऱ्यांदा त्याची कक्षा बदलणार आहे.
Aditya-L1 Mission:
👀Onlooker!Aditya-L1,
destined for the Sun-Earth L1 point,
takes a selfie and
images of the Earth and the Moon.#AdityaL1 pic.twitter.com/54KxrfYSwy— ISRO (@isro) September 7, 2023
दरम्यान, 2 सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा मधून सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी ‘आदित एल 1’ चे प्रक्षेपण झाले होते. इस्त्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV -S57 च्या माध्यमातून आदित्य एल 1 अवकाशात झेपावले. आदित्य एल-1 ला लेग्रॅन्जियन पॉइंट 1 च्या पोकळ कक्षेत ठेवले जाईल. हा बिंदू पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे. हा बिंदू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये स्थित आहे.
सूर्यापासून पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत ते फक्त 1% आहे. आदित्य L-1 ला या टप्प्यावर पोहोचण्यासाठी चार महिने लागणार आहे. आदित्य-L1 मोहिमेचा उद्देश L1 भोवतीच्या कक्षेतून सूर्याचा अभ्यास करणार आहे. येथील सूर्याचे तापमान, सौरवादळ, सौरज्वाला, ओझेनचा थर यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास या मिशनद्वारे केला जाणार आहे.