मुंबई – पावसाळ्याचे दिवस सुरू होताच अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून निवांत वेळ घालवणे अनेकांना आवडते. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार देखील आपल्या कामातून ब्रेक घेऊन बाहेर कुटुंबासोबत फिरण्याचा मार्ग निवडतात. यातच आता अभिनेत्री सोनाली खरे देखील विदेशात पतीसोबत फिरण्यासाठी गेली आहे. येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सोनाली खरे कुटुंबासोबत युरोपमध्ये फिरण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. येथे तिने विविध ठिकाणी भेट दिली आहे. या फोटोमध्ये ती खुप आनंदी असल्याचे दिसते. सध्या तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे.
दरम्यान, सोनाली खरे अभिनयासह तिच्या फिटनेससाठी देखील अधिक ओळखली जाते. सोनालीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच काही रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या आदिपुरुष या सिनेमात प्रभूश्रीरामाच्या सावत्र आई अर्थात जिच्यामुळे संपूर्ण रामायण घडलं त्या कैकयीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री सोनाली खरे हिने साकारली आहे.