सातारा – कळंबे ता. सातारा येथील विदिशा इंदलकर या विद्यार्थिनिने लिहलेल्या ‘ ‘भारतीय न्यायव्यवस्थेपुढील प्रलंबीत खटले, या खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी मेडीएशन ( मध्यस्थ ) चा प्रभावी पर्याय ‘ यासंदर्भात अभ्यासपुर्ण निबंध ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ लॉ मैनेजमेंट’ या आंतररास्ट्रीय मासिकात प्रकाशीत झाला आहे .
विदिशा ही पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजच्या ‘ फिरोदिया विधी महाविद्यालायात शिक्षण घेत आहे.ती महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ज्यांचे अनेक लेख, कथा, पुस्तके प्रकाशीत आहेत त्या लेखक अशोक धर्माजी इंदलकर यांची कन्या आहे.
यापुर्वी कु.विदिशा ही संयुक्त राष्ट्रसंघातर्फे ( युनो ) २०१८ साली ग्लोबल व्हॉलेंटीयर प्रोग्रेम साठी राष्ट्रीय स्तरावर निवड होऊन युरोपमधील ईटली या देशामधे जाऊन आली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेपुढे सध्या प्रलंबीत खटल्याचा गंभीर प्रश्न असून विदिशाने या बाबत अतीशय अभ्यास पुर्ण लेख लिहल्याने इंटरनॅशनल लॉ जनरल मधून तो प्रकाशीत झाल्याने कळंबे ग्रामस्थांकडून तिचे कौतुक होत असल्या बाबतची माहिती कळंबे गावचे उपसरपंच अॅड. विजय इंदलकर यांनी सांगीतले आहे.