टोक्यो – पदार्पणवीर लव्हलिना बोर्गोहेनने (६९ किलो) टोक्यो ऑलिम्पिक बॉक्सिंगमधील भारताच्या पहिले पदक जिंकले आहे. गेल्या आठवड्याच लव्हलिनाने चायनीज तैपेईच्या माजी विश्वविजेत्या नीन-शिन चेनला नामोहरम केले होते.
आसामची २३ वर्षीय बॉक्सिंगपटू लव्हलिनाने उपांत्यपूर्व सामन्यात चेनचा ४-१ असा पराभव केला होता. आता उपांत्य सामन्यात तिची टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीशी लढत झाली. बुसेनाझने उपांत्यपूर्व सामन्यात युक्रेनच्या अॅन लायसेन्कोला हरवले होते.
#IND's Lovlina Borgohain wins India's THIRD medal at #Tokyo2020 – and it's a #Bronze in the women's #Boxing welterweight category! #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Olympics pic.twitter.com/wcX69n3YEe
— Olympic Khel (@OlympicKhel) August 4, 2021