न्हावरे (वार्ताहर) – शिरूर- हवेलीतील सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते आणि घोडगंगा कारखान्याचे प्रामाणिक कर्मचारी यांनी केलेल्या सहकार्यामुळेच ऐतिहासिक मतांनी शिरूर-हवेलीचा आमदार होऊ शकलो, असे प्रतिपादन शिरूरचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांनी केले.
न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कामगारांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात आमदार अशोक पवार बोलत होते.
पवार म्हणाले की, घोडगंगाचे कामगार आणि माझे कुटुंबासारखे संबंध असून कामगारांनी मला कायमच सहकार्य केले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार, घोडगंगाचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, शिरूर तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा विद्या भुजबळ, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सागरराजे निंबाळकर, माजी कार्यकारी संचालक संभाजीराव पाटील, कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, घोडगंगाच्या कामगार सोसायटीचे अध्यक्ष हर्षद माळवदकर, अविनाश ढेकाने, व्ही. ए. पाटील, रंगनाथ फराटे, किरण दोरगे, संजय शितोळे, बी. आर. सायकर, दत्तात्रय दरेकर, एस. पी. डुबल, एस. एस. यादव, माणिक कदम, उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, संचालक बाबासाहेब फराटे, पोपटराव भुजबळ, राजेंद्र गावडे, मनीषा सोनावणे, लतीका वराळे, दत्तात्रय देशमुख, महादेव मचाले, बी. एस. पाटील, संदीप फराटे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन मंगेश ढवळे यांनी तर धनंजय फराटे यांनी आभार केले.