-->

आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन उपराष्ट्रपतींनी केला अभिनव पध्दतीने साजरा

22 भारतीय भाषांमध्ये ट्विट आणि 24 प्रादेशिक वृत्तपत्रात उपराष्ट्रपतींचे लेख

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी आज अभिनव पद्धतीने साजरा केला. त्यांनी 22 भारतीय भाषांमध्ये ट्विटर संदेश पाठवला याशिवाय मातृभाषेच्या उन्नतीचे महत्व सांगणारे लेख 24 प्रादेशिक वृत्तपत्रात लिहीले.

आपल्या संस्कृतीचा पाया असणाऱ्या गोष्टींपैकी भाषिक वैविध्य ही एक गोष्ट आहे असे आपल्या ट्विटमध्ये नमूद करत भाषा ही फक्त आपल्यामध्ये संवाद साधण्याचे साधनच नाही तर ती आपल्याला आपली परंपरेशी जोडून ठेवत आपली सामाजिक-सांस्कृतिक ओळख म्हणून काम करते असे नायडू यांनी म्हटले आहे.

प्राथमिक शिक्षणापासून ते राज्यव्यवस्थेपर्यंत सर्व वर्तुळात मातृभाषेचा वापर वाढवण्याचे आवाहन करत आपले विचार आणि कल्पनांना आपल्या भाषेत सृजनात्मकरित्या व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या आवश्‍यकतेवर त्यांनी भर दिला.

नायडू यांनी तेलुगू, तामिळ, हिंदी, गुजराथी, कश्‍मीरी, कोंकणी, मराठी, उडिया, उर्दू, मल्याळम, कन्नड, पंजाबी, नेपाळी, आसामी, बंगाली, मणिपुरी, बोडो, संथाळी, मैथिली,डोंगरी न संस्कृत या भाषांमधून ट्विटर संदेश पोस्ट केले.

उपराष्ट्रपतींनी लिहीलेले लेख इंग्लिश, हिंदी, तेलुगू, तामिळ, मराठी, उडिया, उर्दू,आसामी,मैथिली, मल्याळम, गुजराती, बंगाली, कोंकणी, बोडो. संथाली, नेपाळी, सिंधी, डोंगरी, काश्‍मिरी आणि संस्कृत भाषांमधील आघाडीच्या वृत्तत्रातून प्रसिद्ध झाले. याआधी 16 फेब्रुवारी 2021 रोजी उपराष्ट्रपतींनी सर्व संसद सदस्यांना मातृभाषेला प्रोत्साहन देण्याबाबत लेखी विनंती केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.