जुन्नर – जुन्नर शहर कापड व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राकेश शहा, उपाध्यक्षपदी विकी पंजवाणी यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
या असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये आगामी वर्षभराकरिता नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. त्यामध्ये सचिव : जयकिशन परदेशी, खजिनदार : सतेज नानावटी, सल्लागार : तेजस मेहता, संतोष वाव्हळ, राजेश पंजवाणी, तेजस कालेकर, विकास सांगडे, नितीन नानावटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जुन्नरमधील लहानमोठ्या व्यापारांचे असणारे विविध प्रश्न अडीअडचणी सोडवण्याकरिता असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न होणार असून व्यापारी बांधवांकरिता सहल आयोजित केली
जाणार असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार असल्याचे नुतन कार्यकारणीच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले.