बारामती, (प्रतिनिधी)- बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी उपाध्यक्षपदी माळेगाव बुद्रुक येथील प्रणव चंद्रकांत तावरे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रणव तावरे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे ही निवड करण्यात आली असल्याची माहिती बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
प्रणव तावरे यांनी शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षण घेतले असून विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रणव तावरे हे अग्रेसर असतात. कोविड काळात माळेगाव कोविड सेंटरमध्ये मोठे बंधू माजी सरपंच दीपक तावरे यांच्या माध्यमातून करोना रुग्णांची मदत करण्यास तावरे यांचा मोलाचा वाटा होता.
नियुक्ती करतेवेळी बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी सभापती संजय भोसले, कार्याध्यक्ष धनवान वदक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, तुषार कोकरे यावेळी उपस्थित होते.