नवी दिल्ली :– आगामी आयपीएल-2023 च्या हंगामासाठी सर्वच संघाकडून आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. पंजाब किंग्स नंतर आता सनरायझर्स हैदराबादने आपले मुख्य प्रशिक्षक बदलले आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या फ्रेंचायझीने टॉम मूडी यांना मुख्य प्रशिक्षक पदावरून हटवून वेस्ट इंडिजचा अनुभवी फलंदाज ब्रायन लारा यांची शनिवारी नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे.
🚨Announcement 🚨
The cricketing legend Brian Lara will be our head coach for the upcoming #IPL seasons. 🧡#OrangeArmy pic.twitter.com/6dSV3y2XU2
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 3, 2022
मूडीजच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने 2022 साली अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती. सनरायझर्स हैदराबादने ट्विटरवर लारा यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती जाहीर केली. मुथय्या मुरलीधरन लाराचा सहाय्यक असेल. गतवर्षी डिसेंबरमध्ये रणनीतिक सल्लागार आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत काम करत होते.
As his term with us draws to an end, we would like thank Tom for his contributions to SRH. It has been a much cherished journey over the years, and we wish him the very best for future endeavours. pic.twitter.com/aGKmNuZmq8
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 3, 2022
सनरायझर्स हैदराबादने Sunrisers Hyderabad आपल्या ट्विटर अकाऊंटवरून लिहिले आहे की, ‘आमच्यासोबत टॉम मूडीचा कार्यकाळ संपत आहे. त्यांच्या सेवेबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. गेल्या काही वर्षांपासून त्याच्यासोबतचा प्रवास खूप छान होता. आम्ही त्यांना त्याच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो.