कोल्हापूर(प्रतिनिधी) – ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक, चित्रकार चंद्रकांत दत्तात्रय जोशी यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी यांचे चे वडील होत. त्यांच्या जाण्याने कलासृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते दर्जेदार चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहिले. कोल्हापुरच्या सिने आणि कलासृष्टीचा चालत बोलता इतिहास आणि जगभरातील समांतर, कलात्मक आणि वेगळा विचार मांडणाऱ्या चित्रपटांना फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवणारे चंद्रकांत जोशी यांच्या निधनाने सिने-सांस्कृतिक चळवळीची न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने कोल्हापुरात शोककळा पसरली आहे.