साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडाचा “लाईगर’ बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. आता या सिनेमाबाबत एक मोठी गोष्ट चर्चेत आली आहे. “लाईगर’मध्ये जगद्विख्यात बॉक्सिंगपटू माईक टायसन देखील दिसणार आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने एक व्हिडिओ रिलीज करून याबाबतची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा आणि माईक टायसन एकत्र दिसत आहेत. माईक टायसन एकेकाळी जगातील एक क्रमांकाचा हेवीवेट बॉक्सिंग चॅम्पियन राहिलेला आहे. “लाईगर’मध्ये टायसन एक महत्त्वाचा रोल करणार आहे, असे समजले आहे.
“लाईगर’चे डायरेक्शन प्रसिद्ध डायरेक्टर पुरी जगन्नाथ करणार आहेत. “लाईगर’मध्ये विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटिंग गोव्यामध्ये सुरू आहे. “लाईगर’मध्ये विजय देवरकोंडा एका किक बॉक्सरच्या रोलमध्ये दिसणार आहे.
एकाच वेळी अनेक भाषांमध्ये हा सिनेमा केला जाणार आहे. “लाईगर’ यावर्षी 9 सप्टेंबरला रिलीज होणार होता. मात्र थिएटर उघडण्याची घोषणा उशिरा झाल्यामुळे सिनेमाचा रिलीज पुढे ढकलला गेला आहे.
आता दिवाळीमध्ये “लाईगर’ रिलीज होईल. ही वाढीव मुदत मिळाल्यामुळे सिनेमात टायसनचा सहभाग घेण्यासाठी धर्मा प्रॉडक्शनला थोडा जास्तीचा अवधी मिळाला आहे.