दिग्गज अभिनेता किरण कुमारही करोना पॉझिटिव्ह

बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता किरण कुमारदेखील करोना व्हायरसचे बळी पडले आहेत. यापूर्वी गायक कनिका कपूर आणि निर्माता करिम मोरानी यांच्या कुटुंबात करोना व्हायरस पसरला होता. आता हे संक्रमण अभिनेता किरण कुमार यांनाही झाले आहे. याबाबत अभिनेत्याने एका मुलाखतीत माहिती दिली आहे. सध्या करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू आहे.

अभिनेता किरण कुमार यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांना केरोनाची लागण झाल्याचे 14 मे रोजी कळले. मला मुंबईतील इस्पितळात वैद्यकीय उपचार करायचे होते. त्यासाठी माझ्या अनेक प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. याअंतर्गत माझी कोविड-19 चाचणीही घेण्यात आली आणि 14 मे रोजी मी करोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले.

किरण कुमार म्हणाले, मला करोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नव्हती. सर्दी, खोकला, ताप किंवा कोणत्याही प्रकारची वेदना होत नव्हती. करोनाची कोणतेही लक्षणे दिसत नव्हती. यामुळे मला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले नाही. या क्षणी मी स्वत:च्या घरात आराम करत आहे. तसेच एकांतात राहून खबरदारी घेत असल्याने त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.