सातारा – पुण्यातून सातारा जिल्हा कारागृहात आलेल्या आणि करोनाची लागण झालेल्या सहा कैद्यांनी कोव्हिड19 आजारावर मात केली आहे.
त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. या कैद्यांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.