अंबवणेमध्ये एकाला करोनाची लागण
वेल्हे(प्रतिनिधी) : वेल्ह्यात करोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून करोना वेल्ह्याची काही पाठ सोडत नाही.पानशेत परिसरात करोनाचे दोन रूग्ण मागच्या आठवड्यात आढळले होते. मंगळवार (दि.३०)रोजी वेल्ह्यातील अंबवणे येथील एका पुरूषास लागण झाल्याचे आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी अंबादास देवकर यांनी सांगितले.
सबंधित व्यक्ती ही नसरापुर येथील एका कंपनीत नोकरीला होती.त्या कंपनीतील एकास करोनाची लागण झाली होती.त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली आहे.सबंधित पुरूषाच्या संपर्कातील ७ ते ८ व्यक्ती आले असल्याचे वेल्हे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
पानशेत परिसरात २३ व २४ जूनला दोन रूग्ण आढळले होते.त्यानंतर अंबवणे येथे एक रूग्ण आढळल्याने तालुक्यात करोना रूग्णांची संख्या ३६ झाली आहे.