मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा आपल्या सासरी परतली असून तिने आपल्या पतीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. थोड्या दिवसांसाठी विदेशातून पुन्हा भारतात येऊन प्रियांकाने आपल्या जवळच्यांची भेट घेतली आणि ती पुन्हा एकदा आपल्या घरी परतली. प्रियांका आता बॉलिवूड ते हॉलिवूड सेलिब्रेटी झाली असल्यामुळे तिच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची चाहत्यांना उत्सुकता असते.
सासरी म्हणजेच विदेशात आपल्या पतीकडे गेल्यानंतर प्रियांकाने गपचूप रस्त्यांवरून फिरण्याचा आनंद घेतला. लास वेगसच्या रस्त्यावर निक जोनस आणि प्रियांका चोप्रा हातात हात घालून फिरताना दिसून आले. याच जागेवर प्रियंकाने काही महिण्यापुर्वी मोठ्या लाईव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली होती. लास वेगसच्या रस्त्यावरून जातानाचा फोटो प्रियांकाने पोस्ट केला आहे ज्यात ती लिहिते,वेगस नाईट विथ बेबी.
प्रियांकाचा हा लेटेस्ट फोटो खूपच चर्चेचा विषय ठरत आहे. प्रियांका तब्बल ३ वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर भारतामध्ये परतली होती. यावेळी प्रियांकाने वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तिथल्या प्रियजनांना भेटण्याचा आपला कार्यक्रम पार पाडला होता. यानंतर ती आता पुन्हा आपल्या सासरी परतली.