मुंबई – प्रियांका चोप्रा बॉलिवूडमध्ये जास्त दिसत नसल्यमुळे तिची स्टाईल आणि अदा आणखी ग्लॅमरस झाल्याचे नेहमीच दिसून येते.मग कधी ती एखाद्या प्रोग्रॅममध्ये रेड कार्पेटवरून जाताना दिसते तर कधी एखाद्या युनिक इंटरनॅशनल ब्रँडची जाहिरात करताना दिसते. दिवसेंदिवस प्रियांकाचा लूक आणखीनच स्टायलिश होत असंल्याचे दिसून येते. नुकतंच लंडनच्या एका शोमध्ये प्रियांकाचा नवा स्टायलिश अंदाज सर्वांना पाहायला मिळाला.
लंडनमध्ये पार पडलेल्या ब्युटी प्रोडक्टच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये प्रियांका चोप्राने देखील हजेरी अल्वाली होती. यावेळी तिचा ग्लॅमरस आणि गोल्डन अंदाज सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. गोल्डन ड्रेसच्या आऊटफिटमध्ये प्रियांका एखाद्या जलपरी प्रमाणे वाटत होती. तिचा हा अनोखा अंदाज चाहत्यांचे डोळे दिपवणारा होता. या इव्हेन्ट दरम्यानचे प्रियांकाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
चाहते प्रियांकाचे केवळ लूकसाठीच नाही तर तिच्या हेअरस्टाइलचेही कौतुक करत आहेत. प्रियांकाच्या एंट्री पासूनचे ते इव्हेन्टमधील अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. प्रियांकाच्या या अनोख्या अंदाजाने चाहते अक्षरशः घायाळ झाले आहेत.