मुंबई – प्रियांका-निक ही जोडी बॉलिवूडसह होलीवूडमध्ये देखील खूप चर्चेत असते. म्हणूनच चाहत्यांना या कपलच्या प्रत्येक कृतीच कुतूहल असत. प्रियंकाने केलेल्या पार्टीपासून ते कपड्यांच्या हटके स्टाईलची चाहत्यांना माहिती हवी असते. नुकतंच प्रियांका निक यांनी एका कार्यक्रमाला एका व्यासपीठावर सोबत हजेरी लावली. यावेळी प्रियांकाने केलेल्या कृतीमुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सेलिब्रेटी नवरा बायको म्हंटल्यावर त्यांची प्रत्येक गोष्ट सर्वसामान्यांना चकित करणारी असते. हेच नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पाहायला मिळालं. जोनस ब्रदर्स एका कार्यक्रमात सोबत फरफॉर्मन्स करणार होते त्यावेळी निकने प्रियंकाला स्टेजवर निमंत्रित केलं. अशावेळी प्रियंकाने स्टेजवर दमदार एन्ट्री केली आणि एंट्री करताच तिने निकल हळुवार पणे सगळ्यांसमोर थेट किस करत आपले प्रेम व्यक्त केलं. यावेळी जमलेल्या प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष करत दोघांचेही स्वागत केले.
View this post on Instagram
न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ‘ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल’मध्ये हा प्रकार घडला. दोघांच्याही या कारनाम्याचा व्हिडीओ मात्र सध्या तुफान व्हायरल होतोय. चाहत्यांकडून प्रियांकाच्या या कृतीच समर्थन होताना दिसतंय तर काहींनी तिला या प्रकारावरून समजावण्याचा देखील प्रयत्न केला आहे. दोघांच्या प्रेमाचा हा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.