मुंबई – प्रियांका चोप्रा जोनस सध्या तिच्या वेब सीरिज सिटाडेलमुळे चर्चेत आहे. अलीकडेच प्रियांकाने एका पॉडकास्ट मुलाखतीत असे काही खुलासे केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर सतत चर्चा होत आहे. या चर्चेदरम्यान आता ‘सिटाडेल’चा नवा ट्रेलर रिलीज झाला आहे.ज्यामध्ये जबरदस्त ऍक्शन पाहायला मिळणार आहे.
या वेब सिरीजची निर्मिती रुसो ब्रदर्सद्वारे करण्यात आली आहे. अव्हेंजर्स चित्रपटांसाठी रुसो ब्रदर्स ओळखले जातात. त्यामुळे आता ही सिरींजी किती जबरदस्त असेल याचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो. याचा प्रदर्शित झालेला ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. ट्रेलरमध्ये प्रियांका व्यातिक्रित इतर हॉलिवूड स्टार जबरदस्त ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
सिटाडेल ही एक स्पाय स्टोरी आहे ज्यामध्ये प्रियंका स्वतः एक गुप्तहेर आहे. त्याच्यासोबत रिचर्ड मॅडन मुख्य भूमिकेत आहे. स्टॅनली टुसी आणि लेस्ली मॅनव्हिल देखील यात आहेत. त्यांचे कॅरेक्टर लूक्सही रिलीज करण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शनसह रोमान्स देखील पाहायला मिळतोय.
सिटाडेल ही प्रियांकाची दुसरी हॉलिवूड सिरीज आहे ज्यात ती एका गुप्तहेराची भूमिका करताना दिसणार आहे. याआधी प्रियांकाने क्वांटिकोमध्ये अशीच भूमिका साकारली आहे. ही सिरीज 28 एप्रिलला ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.