Vasant More । मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. मराठी माणसाच्या हक्काचा विषय असो वा एखाद्याला मदत करणं असो मोरे आपली प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून देत असतात. सोशल मीडियावर देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग असून, त्यांची प्रत्येक पोस्ट नेहमीच ते चर्चेत असते. अशात त्यांची सोशल मीडियावर पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
साहेब मला माफ करा अशी पोस्ट शेअर करत वसंत मोरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ‘ अखेरचा जय महाराष्ट्र…
साहेब मला माफ करा’ असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना नमस्कार करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यानंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी बोलतांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
वसंत मोरे म्हणाले,’मी पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मी सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. तसेच पुढील दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. ‘ असं म्हणत ते येत्या दोन ते तीन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ट्विटरवरुन कार्यालयातील राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दडवंत घालणारा फोटोसह अनेक फोटो शेअर केले होते. मोरे यांच्या निर्णयावर मनसेतल्या एकेकाळच्या जुन्या सहकारी आणि सध्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी मोरेंनी राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. मुंबईतल्या मनसेच्या एकाही नेत्यांनं मोरेंवर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवांनी नाव घेता फेसबूक राज ठाकरेंच्या बुटाचा फोटो पोस्ट केलाय.
यासोबतच अविनाश जाधव यांनी लिहिले आहे की,’एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे.त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे……’
साहेब मला माफ करा असं म्हणून मनसेतून राजीनामा जाहीर केला. मोरे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. पण गेल्याच महिन्यात पुण्यात येऊन शर्मिला ठाकरेंनी शहराध्यक्ष साईनाथ बाबरांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते.
Vasant More । वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट चर्चेत
तर नुकतीच वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. कात्रजच्या डेअरी संदर्भातल्या विषयासाठी ही भेट घेतल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
हे वाचाल का ? गाणे रेकॉर्ड करतांना घशातून निघालं होत ‘रक्त’; या मुस्लिम गायकाने जास्तीत जास्त गायली ‘भजने’