IPS Paritosh Pankaj Injured| तेलंगणातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील सहायक पोलिस अधीक्षक (एएसपी) बंदोबस्तावर असताना मंत्र्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शहर दौऱ्यादरम्यान बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयपीएस परितोष पंकज हे भद्राचलमचे एएसपी आहेत आणि मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या सोमवारी शहर दौऱ्यावर असताना ते ड्युटीवर होते. ड्युटीवर असताना परितोष पंकज यांना कॅबिनेट मंत्री श्रीधर बाबू यांच्या ताफ्यातील एका वाहनाने धडक दिली. कारची धडक इतकी जोरदार होती की, आयपीएस अधिकारी परितोष खाली पडले आणि जखमी झाले.
VIDEO | IPS Paritosh Pankaj, who is posted as ASP Bhadradri Kothagudem district, #Telangana, was hit by a convoy vehicle during the visit of the minister Sridhar Babu. He is under treatment.
(Source: Third Party) pic.twitter.com/KuK8JCzn5L
— Press Trust of India (@PTI_News) March 12, 2024
याबाबत माहिती देताना एक अधिकारऱ्याने सांगितले की, “त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता ते बरे आहेत. ते हैद्राबाद येथील रुग्णालयात आहे.” या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मंत्र्यांच्या वाहनांनी प्रवेश केल्यानंतर पंकज हे बॅरिकेड बंद करण्याचे निर्देश देत होते, त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांना धडक दिली.
नेमकं काय घडलं?
व्हिडिओमध्ये पंकज हे धावताना दिसत आहे, त्यानंतर ते रस्त्याच्या मधोमध उभा राहिले आणि मागून भरधाव येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. अचानक कारची धडक बसल्यानंतर खाली पडल्याचे दिसते. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस त्यांना वाचवण्यासाठी धावले. सुदैवाने ते बाजूला पडल्याने गाडीच्या चाकाखाली आले नाही. या घटनेनंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. IPS Paritosh Pankaj Injured|
हेही वाचा :
पंतप्रधान मोदींचं मोठं मन ! गांधीनगरचा भूखंड केला दान, जाणून घ्या कोणाला आणि का केला दान ?